Solapur : लोकसहभागातून विद्यापीठाचा विकास साधा - राज्यपाल SaamTvNews
महाराष्ट्र

Solapur : लोकसहभागातून विद्यापीठाचा विकास साधा - राज्यपाल

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या अभियानातून महाराष्ट्रातील पहिल्याच विद्यापीठात अशाप्रकारचे क्रिडा सभागृह होत आहे.

भारत नागणे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) उभारल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडा सभागृहाचे भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या अभियानातून महाराष्ट्रातील पहिल्याच विद्यापीठात अशाप्रकारचे क्रिडा सभागृह होत आहे. या सभागृहाचा कोनशिला अनावरण सोहळा संपन्न झाला.

हे देखील पहा :

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया (Khelo India) अभियानातून महाराष्ट्रातील एकमेव सोलापूरच्या (Solapur) विद्यापीठास साडेचार कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. या अनुदानातून बहुउद्देशीय क्रीडा सभागृह उभारले जाणार आहे. त्याचाच भूमिपूजन सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या.

प्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) बोलताना म्हणाले , विद्यापीठाचा विकास साधायचा असेल तर सरकारच्या मदतीसह, अधिकारी, मंत्रीगण, लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिक यांना विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. लोकसहभागातूनच विद्यापीठाचा विकास साधला जाईल. क्रीडा विकासातून अनेक खेळाडू घडतील. राष्ट्रीय तसेच ऑलिंपिक सारख्या स्पर्धा प्रकारात या परिसरातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवावे. असे आवाहनही यावेळी राज्यपाल यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

SCROLL FOR NEXT