Solapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime : धक्कादायक! कौटुंबिक वादातून तरुणाचा खून; सोलापूर येथील घटना

कौटुंबिक वादातूनआठ ते दहा जणांनी मिळून लोखंडी रोड आणि काठीने केलेल्या मारहाणीत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : सोलापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक कारणावरून आठ ते दहा जणांनी मिळून लोखंडी रोड आणि काठीने केलेल्या मारहाणीत २७ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. नितीन पतंगराव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नितीन हा कामावरुन घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरून सासरे महेश शेजेराव, मेव्हणा हर्षवर्धनशेजेराव आणि इतर 8 ते 10 जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि काठीने त्यास मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या मारहाणीत नितीनच्या डोक्यास मार लागला आणि खांद्यास मार लागल्याने त्याला सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यास पुढील उपचारासाठी मार्कंडेय सोलापूर (Solapur) रुग्णालय येथे हलविण्यात आले.

मात्र,उपचारापूर्वीच नितीनचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे.नितिन पतंगराव यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच शासकिय रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मृत नितीनचे सासरे महेश शेजेराव हे सोलापूर शहर पोलीस दलात करायरात आहेत. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी सासरा,मेव्हणा आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT