Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime: खळबळजनक घटना! पतीच्या त्रासाला कंटाळून भावाकडे आली; संतापलेल्या नवऱ्याचे भयंकर कृत्य

Solapur News Update: या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News: नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून भावाकडे राहण्यास आलेल्या विवाहितेवर नवऱ्याने सोलापुरात येऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापुरातील विनायक नगरमध्ये ही घटना घडली. पूजा बाळू क्षीरसागर असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती बाळू क्षीरसागर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळच्या पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील रोपळेतील पूजाचा विवाह पंढरपुरातील बाळू क्षीरसारगर याच्याशी आठ वर्षापूर्वी झाला आहे. अनेक वर्षांपासून त्याला दारुचे व्यसन आहे. बिगारी काम करुन हे कुटुंब उदरनिर्वाह करते. नेहमी बायको पूजाशी तो भांडायचा.

या त्रासामुळे पूजा सोलापुरात नितीन खरे या भावाकडे आठ दिवसांपूर्वी आली होती. घटनेदिवशी भाऊ त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यामुळे रुग्णालयातच होता. घरी पूजा आणि तिचा मुलगा दोघेच होते. या दरम्यान बाळू घरी आला. येथे पती-पत्नीचे भांडण झाले. यातच बाळूने चाकूने पूजाच्या गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले.

जवळच राहणाऱ्या मावशी संगीता बाबरे यांना पूजावर वार झाल्याचे कळताच त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्या गळ्यावर खोलवर जखम झाल्याने बोलू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

Dry Fruits Buying Tips: मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

NCP Merger : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे विधान, अर्थ खात्यावर स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT