Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: १५ दुचाकी, दहा मोबाइलसह आरोपीला अटक

१५ दुचाकी, दहा मोबाइलसह आरोपीला अटक

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बाइक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरलेली बाइक आणि मोबाइल विकण्यासाठी संशयित आरोपी (Solapur) सोलापुरातील नवी पेठेत येणार असल्याची टीप पोलिसांना (Police) मिळाली. यानंतर सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला एक बाइक आणि दहा मोबाइल मिळाले. अधिक तपास केला असता तब्बल १५ दुचाकी मिळाल्या. सखोल तपासानंतर आरोपीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Live Marathi News)

फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बाइक चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदारामार्फत एक व्यक्ती जी. एम. चौकमार्गे नवी पेठत चोरीची मोटारसायकल आणि मोबाइल विक्रीकरिता येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सापळा लावला.

पोलिसांनी सापळा रचल्‍यानंतर संशयिताला ताब्यात घेतले. अविनाश आसवे असं ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे चोरीची मोटारसायकल आणि १० चोरीचे मोबाईल आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्‍त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT