Solapur Crime saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने कापला पत्नीचा कान, सोलापुरातील संतापजनक घटना

Solapur Crime : पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime : सोलापुरातील नवीन विडी घरकुल परिसरात एका व्यक्तीने पतीने मारहाण करत तिचा कान कापल्याची घटना घडली आहे. आरीफा अकिल सय्यद असे पीडित महिलेचे नाव असून तिचा पती अकिल शकील सय्यद फरार झाला आहे.

घटनेनंतर पीडित महिलेच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तिला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत तिच्या कानावर शस्त्रक्रिया केली आणि ३० टाके घालून तिचे कान जोडले. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही विधवा होती. २०१५ पासून ती अकिल सय्यदच्या संपर्कात आली. अकिल हा रिक्षा चालक असून तो देखील विवाहित होता. पहिली पत्नी असतानाही त्याने आरिफा सोबत २०१९ मध्ये निकाह केला. अकिल सय्यदला पहिल्या पत्नी पासून एक मुलगा आहे. (Latest Marathi News)

लग्नापूर्वी आरिफा ही विधवा होती हे माहित असतानाही अकिलने तिला चांगले नांदवण्याचे आश्वासन दिले होते. पण विवाहानंतर चारित्र्यावर संशय घेत तो तिच्यावर घरगुती हिंसाचार करत होता. या प्रकरणी पीडित महिलेने अकिल नेहमी मारझोड करत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. (solapur news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! मदरसा शिक्षकाकडून १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात भयंकर कृत्य

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; महायुतीकडून विश्वासघात झाल्याचा दराडेंचा आरोप

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT