सोलापुरात ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं असून, एक कोटी ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई कनेक्शन उघड झालं असून, महिलेच्या सहभागाबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  saam tv
महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचे अंमली पदार्थ जप्त, मुंबई कनेक्शन उघड, ती महिला कोण?

solapur police seize drugs worth 1 crore 90 lakh : सोलापुरात ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केलीय. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई कनेक्शन उघड झाले आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये, सोलापूर | साम टीव्ही

सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किंमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या सहभागाचाही तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त गोहर हसन आणि पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

१२ मे रोजी सकाळी गुन्हे शाखेचे पोलीस पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यातील पोलीस अंमलदार भारत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला.

कारची झडती घेतली. कारमध्ये असलेल्या संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. रिजवान शब्बीर खान (वय २६, रा. अंबिका नगर भाग-३, नवी जिंदगी, सोलापूर) असं या संशयिताचं नाव आहे. कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटजवळील ड्रॉव्हरमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळून आला.

फॉरेन्सिक तपासणीत हा पदार्थ मेफेड्रोन (एमडी) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी १ कोटी ९० लाख रुपये किंमतीचे ९५० ग्रॅम एमडी जप्त केले. तसेच १० लाख रुपये किंमतीची कार असा एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात रिजवान खान याच्यासह साहील सिकंदर पिरजादे (रा. सोलापूर) याला अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान या गुन्ह्यात मूळची मुंबईची आणि सध्या सोलापूरच्या मंत्रीचंदक नगर येथे राहणाऱ्या महिलेच्या सहभागाची शक्यता आहे. तिच्याबाबत अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदींच्या आवाहनाविरोधात पवार-ठाकरे आक्रमक, 'चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?'

Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

Cranberries Benefits: क्रेनबेरीज खाण्याचे जबरदस्त फायदे; शरीर निरोगी ठेवण्यासाठी 'हे' फळ आहे सुपरफूड

अजितदादांनंतर राष्ट्रवादीत 'पॉवर गेम'? पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं? सुनेत्रा पवारांच्या पत्राने राजकीय भूकंप!

SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT