barshi sharad pawar rally news barshi sharad pawar rally news
महाराष्ट्र

Solapur : शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

Sharad Pawar : सोलापूरमधील बार्शी येथे आज शरद पवार यांची भव्य सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Namdeo Kumbhar

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर

Sharad Pawar News : सोलापूरमधील बार्शी येथे आज शरद पवार यांची भव्य सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सभेला येण्याआधी शरद पवारांचा ताफा कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकांनी आडवला होता. त्याशिवाय सभा सुरु असताना अनेकांनी काळे झेंडे दाखवल्याचा प्रकारही घडला. एक मराठा लाख मराठाच्या दिल्या घोषणाही दिल्या. शरद पवार यांचं भाषण सुरु असातनाचा एक धक्कादायक घटना होता होता थोडक्यात वाचली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली. सभेच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणीच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग टळला. हातात पेट्रोलची बाटली घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

पवारांनी सत्ताधाऱ्यांवर सोडला टीकेचा बाण -

बार्शी येथील सभेमध्ये शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. ४०० पार म्हणत होते, ३०० पारही जाता आले नाही, असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रभाताई झाडबुके या माझ्यासोबत बार्शीच नेतृत्व करत होत्या. ओमराजे यांना 50 हजारांपेक्षा जास्त लीड बार्शीने दिला आहे. महाराष्ट्रात तुमचं हित जपणारे सरकार आणायचे आहे, अन्याय आणि जुलम करणारे सरकार खाली खेचा, असेही पवार यावेळी म्हणाले.

आंध्रप्रदेश आणि बिहारच्या जीवावर केंद्र सरकार सत्तेवर आले आहे. यांची धोरणं बदलयची असेल तर सरकार बदलायला हवं, असेही शरद पवार म्हणाले.

बार्शीमध्ये शरद पवार शेतकरी मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या (Solapur) बार्शीत आज 'शेतकरी संवाद मेळावा' पार पडला. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते माढा आणि धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटिल आणि ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार देखील (Maharashtra Politics) झाला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवारांचा हा मेळावा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात बार्शी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT