Solapur, solapur anti- encroachment drive saam tv
महाराष्ट्र

Solapur News : साेलापूरात अतिक्रमणांवर हाताेडा, व्यापा-यांचे बंदचे आवाहन; सराफ कट्टा, मारुती परिसरात शुकशुकाट

Solapur Anti-Encroachment Drive : सुमारे २५ फुटपेक्षा जास्त उंचीच्या अनाधिकृत बांधकामांना लक्ष केले.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात सराफ कट्टा, मंगळवार पेठेतील मधला मारुती या परिसरात धडक कारवाई केली. यामुळे व्यापा-यांनी आस्थापनांचे नुकसान झाल्याचा दावा करीत आज अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. (Maharashtra News)

सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने गेल्या दाेन दिवसांत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणांवर हाताेडा चालविला आहे. सोमवारी शहरातील नई जिंदगी परिसरात सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली. सुमारे २५ फुटपेक्षा जास्त उंचीच्या अनाधिकृत बांधकामांना लक्ष केले.

या कारवाईमुळे नई जिंदगी परिसरातील मुख्य रस्त्याने माेकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सराफ कट्टा, मंगळवार पेठेतील मधला मारुती या परिसरात धडक कारवाई केली. काही ठिकाणी जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईप्रसंगी पाेलिसांचा बंदाेबस्त हाेता.

दरम्यान अतिक्रमण विभागाच्या कारवाईमुळे आमच्या आस्थापनांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापा-यांनी केला. या कारवाईचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (बुधवार) व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवली. या बंदमुळे सराफ कट्टा, मंगळवार पेठेतील मधला मारुती परिसरात आज शुकशुकाट हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaphal Kheer Recipe : अवघ्या १० मिनिटांत स्वीट डिश तयार, झटपट बनवा सर्वांना आवडेल अशी सीताफळाची खीर

Maharashtra Live News Update: धुळ्यात जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात

Navi Mumbai Famous Place: लोणावळा, खंडाळा फिरून कंटाळा आला? नवी मुंबईतील ही ५ ठिकाणे नक्की फिरा

Bihar Election : राजकारणात पुन्हा भूकंप; मुख्यमंत्र्यांकडून पक्षातील माजी मंत्र्यांसिहत १६ बडे नेते निलंबित, कारण काय?

Weather Update: पुढील ३ तासात महत्त्वाचे; जळगाव,मुंबईसह उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT