Solapur Agricultural Produce Market Committee Election Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य ते शक्य! भाजप अन् काँग्रेस अखेर एकत्र...

Solapur Agricultural Produce Market Committee Election : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Prashant Patil

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचं एकत्रित पॅनल करण्यात आलंय. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचं आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलं आहे. पण माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागच्या निवडणुकीवेळीही तत्कालीन पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी पाठिंबा दिला होता. तर आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय, यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नाही. दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत त्यांना देखील सोबत येण्याचं आवाहन आम्ही केलं आहे. पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणं कठीण आहे. पण आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न करतोय', असं भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT