Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या बसला डंपरची धडक; चालकामुळे मोठी दुर्घटना टळली, सातजण जखमी

Solapur News : सोलापूर- तेलगाव ही मुक्कामी बस चालक विजय लोभे आणि वाहक प्रशांत जेटेथोर घेऊन सोलापूर बसस्थानकावरून मार्गस्थ झाले मंद्रूप थांबा घेऊन निंबर्गीच्या दिशेने निघाली यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरहून तेलगावला प्रवाशी घेऊन मार्गस्थ झालेल्या बसला भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या डंपरने बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह एकूण सात जण जखमी झाले. दरम्यान बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे जीव वाचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील निंबर्गी गावाजवळ सदरचा अपघात गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. सोलापूर- तेलगाव ही मुक्कामी बस चालक विजय लोभे आणि वाहक प्रशांत जेटेथोर घेऊन सोलापूर बसस्थानकावरून मार्गस्थ झाले होते. तर मंद्रूप येथील थांबा घेऊन एसटी निंबर्गीच्या दिशेने निघाली यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते. निंबर्गी गावापासून एक किलोमीटर अंतरावर समोरून भरधाव वेगात आलेल्या डंपरने धडक दिली. 

मोठा अनर्थ टळला 

दरम्यान भरधाव वेगाने डंपर येत असल्याचे पाहून बस चालक विजय लोभे यांनी एसटी रस्त्याच्या खाली घेतली. मात्र तोपर्यंत डंपरने धडक दिली. बसला धडक बसल्यामुळे आतील प्रवासी एकमेकांवर आदळले. यामध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. एसटी चालक विजय लोभे यांच्या प्रसंगावधानामुळे या अपघातातील प्रवाशांचे जीव वाचले. 

चालकासह सातजण जखमी 
बस आणि डंपरच्या अपघातात एसटी चालक चालक विजय नागनाथ लोभे आणि डंपर चालक परशुराम बगले या दोघांसह बाबासाहेब आण्णाप्पा कदम (रा. भंडारकवठे), नितीन चिदानंद चौगुले (रा. विंचूर), आनंदराव कलाप्पा सुतार आणि सुनंदा सुरेश सुतार (दोघे रा. तेलगाव), सुनंदा मारुती जोडमोटे (रा. मंद्रूप) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. तर परशुराम बगले आणि बाबासाहेब कदम या दोघा जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT