Solapur Accident News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Accident News: भरधाव दुचाकीची ट्रॉलीला जोरदार धडक; अपघातात जिगरी मित्राचा जागीच मृत्यू, एक जखमी

Solapur News: ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस कोणतेही दिवे किंवा लाल चिन्ह लावलेले नव्हते. त्यामुळे अमीरकडून ट्रॉलीला जोराची धडक बसली. या अपघातात अमीर गंभीर जखमी झाला.

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

Accident News:

सोलापूर येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीये. दुचाकीवरून जात असताना दोन मित्रांचा भीषण अपघात झालाय. दुचाकी आणि ट्रॉलीची जोरदार धडक झाल्याने यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक तरुण गंभीर जखमी आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन्ही तरुण हे बार्शीचे असून ते उस्मानाबाद येथून बार्शीला येत होते. यावेळी तांदुळवाडीजवळ ट्रॉलीच्या धडकेत एका मित्राचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. या अपघातात मृत्य पावलेल्या मित्राचे नाव अमीर मुबारक सय्यद (वय 28 वर्षे) असून, तो ख्याजानगर, बार्शी येथे राहत होता. जखमी झालेल्या मित्राचे नाव सोहेल शकील खान (वय 20 वर्षे) असून, तो आदर्शनगर, नागने प्लाँट, बार्शी येथे राहत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर आणि सोहेल हे दोघेही 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता बार्शी येथून उस्मानाबादला काही कामानिमित्ताने गेले होते. तेथे काम करून ते 24 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता उस्मानाबादहून बार्शीकडे निघाले.

सकाळी 6.15 वाजता ते तांदुळवाडीजवळ आले असता रस्त्याच्या मध्यभागी ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या आणि ट्रक्टर थांबले होते. ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस कोणतेही दिवे किंवा लाल चिन्ह लावलेले नव्हते. त्यामुळे अमीरकडून ट्रॉलीला जोराची धडक बसली. या अपघातात अमीर गंभीर जखमी झाला, तर सोहेल मोटारसायकलवरून रस्त्यावर पडला.

दोन्ही मित्रांना तातडीने ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच अमीरचा मृत्यू झाला. सोहेलवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच ट्रक्टरचालकाचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT