Bribe Saam tv
महाराष्ट्र

Bribe: १५ हजारांची लाच घेताना ACB ने वीज निरीक्षकास रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच रचला सापळा.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : विद्युत ठेकेदाराचा परवाना देण्यासाठी मागणी केलेल्या रकमेपैकी १५ हजारांची लाच (bribe) स्वीकारल्याप्रकरणी सहायक विद्युत निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आल आहे. ही कारवाई सोलापुरातील (solapur) अंत्रोळीकर नगरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) केली आहे. (solapur latest marathi news)

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात (vijapur naka police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजुलअल्ली मेहबूब मुल्ला असे अटक करण्यात आलेल्या सहायक विद्युत निरीक्षकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी : निरीक्षक कार्यालयात इलेक्ट्रिकलची कामे घेण्याकरिता नवीन फॉर्म देण्याचे काम सुरू होते. तक्रारदाराने आवश्यक असणारा विद्युत पर्यवेक्षक परवाना तसेच विद्युत ठेकेदार परवाना मिळवण्यासाठी विद्युत निरीक्षक विभाग (सोलापूर) येथे अर्ज केला होता. तक्रारदाराला विद्युत पर्यवेक्षक परवाना मिळाला आहे. विद्युत ठेकेदार तक्रारदार परवाना मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होता. तेव्हा तक्रारदाराला यापूर्वी दिलेल्या विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे बक्षीस म्हणून १० हजार रुपये आणि सध्याच्या ठेकेदार परवान्याचे २२ हजार अशी एकूण ३२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली हाेती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विद्युत निरीक्षक कार्यालयात सापळा रचून ३२ हजारांचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये स्वीकारताना फैजुलअल्ली मेहबूब मुल्ला यास रंगेहाथ पकडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४ वर्ग, एक खोली अन् एकच शिक्षक... जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची बिकट अवस्था!

Flax Seeds Laddu Recipe : हिवाळ्यात सांधेदुखी होईल दूर, रोज खा जवसाचा पौष्टिक लाडू

Jowar Khichdi Recipe: डाईट सुरु केला आहे पण टेस्टी खायची इच्छा होते? मग रात्री घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी ज्वारीची खिचडी

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

New Marathi Serial : "प्रेम की पैसा..."; 'झी मराठी'वर सुरू होणार नवीन मालिका, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

SCROLL FOR NEXT