paratwada, nibhor phata, accident saam tv
महाराष्ट्र

Amravati : निभोरा फाट्यानजीक अपघात; सहा ठार, चांदूर बाजार तालुक्यातील एक जखमी

मध्यरात्रीच्या सुमारास घडला अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) जिल्ह्यातील परतवाडा (paratwada) शिरजगाव बैंतुल रोडवर मध्यरात्री निभोरा फाटा जवळ चार चाकी आणि दुचाकीच्या अपघातात (accident) सहा ठार तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातामधील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (amravati latest marathi news)

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी : शिरजगाव पोलीस ठाणे येथील रात्रगस्त अंमलदार हे गस्त असताना त्यांना रस्त्यावरील पुलाजवळ मोटरसायकलची शीट पडलेली दिसली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले. या अपघातातील जखमी व मृतक हे वाहनात फसलेले होते. त्यांना वाहनातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले.

या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे, सतीश सुखदेव शनवारे , सुरेश विठ्ठल निर्मळे, रमेश धुर्व, प्रतीक दिनेशराव मांडवकर, अक्षय सुभाष देशकर यांचा समावेश आहे. तसेच या अपघातात संजय गजानन गायन (राहणार बोदड, ता. चांदूर बाजार) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT