साक्री नगरपंचायत निकालास गालबोट लागले; कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

साक्री नगरपंचायत निकालास गालबोट लागले; कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू

साक्री नगरपंचायतीच्या निकालानंतर या निवडणुकीला गालबोट लागले

भूषण अहिरे

धुळे: साक्री नगरपंचायतीच्या (nagar panchayat) निकालानंतर या निवडणुकीला (election) गालबोट लागले आहे. साक्री नगरपंचायतीच्या मतमोजणीनंतर पराभुत उमेदवाराच्या मुलास विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या दरम्यान आपल्या भावाला सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

साक्री (sakri ) नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 येथे पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या महिला उमेदवाराच्या मुलाने रात्री जवळपास ८ वाजेच्या दरम्यान विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असताना त्यामध्ये जाऊन त्यांच्या सोबत हुज्जत घातली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

यादरम्यान पराभूत उमेदवाराच्या मुलास विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण करण्यात आली. आपल्या भावाला या मारहाणीतून सोडवण्यास गेलेल्या बहिणीला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात (hospital) मृत महिलेचा मृतदेह बराच वेळ तसाच पडून आहे. नातेवाईकांनी जोपर्यंत मारेकर्‍यांना ताब्यात घेणार नाही. त्यांना पोलिस (Police) प्रशासनातर्फे शासन केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर या संतप्त नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT