गायक उमेश गवळी यांची भेट घेऊन सत्कार करताना आमदार रोहित पवार. 
महाराष्ट्र

"रोहित दादा तुम्ही माणूस हाय लय ग्रेट..." ओ शेठच्या गायकाची पावती

Ashokraje Nimbalkar

अहमदनगर ः संपूर्ण राज्यात ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट... या गीताने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण ढंगाचं हे गाणं असलं तरी शहरी भागात या गाण्याचे मोठे चाहते आहेत. शहरीबाबूही या गाण्याच्या प्रेमात पडले आहेत. हे गाणं म्हणजे आपल्या नेत्याविषयी कार्यकर्त्याने व्यक्त केलेल्या भावना आहेत. रॅप, पॉपच्या जमान्यात ओ शेठ तु्म्ही माणूस हाय लय ग्रेट... हे गीत ग्रामीण ढंगामुळे उठून दिसतंय. आणि ते ट्रेंडिंगमध्येही आहे.

लॉजिक स्टुडिओच्या माध्यमातून उमेश गवळी यांनी हे गाणं गायलंय. सुरूवातीला नाकं मुरडणारी लोकंच या गाण्याच्या प्रेमात पडलीत. गावागावातील तरूणांच्या ओठावर हेच गाणं आहे. या गाण्यामुळे लोकप्रिय ठरलेल्या उमेश गवळी या गायकाची कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुकही त्यांनी केले.Singer Umesh Gawli felicitated by Rohit Pawar

पवार हे नेहमीच गुणी कलाकारांची भेट घेत त्यांना प्रोत्साहन देत असतात. शक्य तेवढी मदत करण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. दोनच दिवसांपूर्वी सृजनच्या माध्यमातून भजन स्पर्धा घेत गायक,वादक, कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलं.

आपुलकीने चौकशी करीत गवळी यांचा आतापर्यंतचा संघर्षही रोहित पवारांनी जाणून घेतला. त्यामुळे भारावलेल्या गवळींनी पवारांना दादा तुम्ही माणूस हाय लय ग्रेट, अशा शब्दांत कौतुक करताच हशा पिकला.

या भेटीबद्दल स्वतः रोहित पवार यांनीच भेटीचे फोटो शेअर करीत माहिती दिली. ते लिहितात, 'ओ शेठ...' या गाण्याचे गायक उमेश गवळी यांची भेट झाली. हरहुन्नरी कलाकार असलेल्या उमेश यांनी बँड पथकात ऑर्गन वादन करत असताना छोटे-मोठे ऑर्केस्ट्रा, लावणी, लोकधारा, लग्न समारंभ अशा कार्यक्रमांमध्ये की बोर्ड वादन करीत स्वतःचा लॉजिक स्टुडिओ उभा केला.

त्यांचं 'तुला काय सोनं लागलंय का' हे पहिलंच गाणं तसंच 'घुंगरू पैंजनाचं पायात वाजलं' हे गाणंही हिट झालं. 'ओ शेठ..' या गाण्याने तर त्यांना मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!Singer Umesh Gawli felicitated by Rohit Pawar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Summer: उन्हाच्या कडाक्यात चेहऱ्याला लावू नका या गोष्टी, डॉक्टरांनी दिल्या टिप्स

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : जळगावात एटीएम मशीन चोरीला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

SCROLL FOR NEXT