Malvan bandh Today  Saam Tv
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : दुकानं बंद...शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वातावरण तापलं, 'मालवण बंद'ची हाक

Malvan bandh Today Shivaji Maharaj statue collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वातावरण तापलंय. आज मालवण बंदची हाक देण्यात आलीय.

Rohini Gudaghe

विनायक वंजारे, साम टीव्ही सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी समोर आलीय. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज मालवण बंदची हाक देण्यात आलीय. महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मालवणात प्रतिसाद मिळालेला दिसत आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळला...

व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा दिल्याचं चित्र दिसत (Sindhudurg News) आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने जनसंताप मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे सहभागी होणार असल्याचं समोर आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज मालवण बंद पाळला जात आहे.

'मालवण बंद'ची हाक

राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या या पुतळ्याचं उद्धघाटन झालं होतं. त्यानंतर हा पुतळा कोसळल्याचं आता समोर आलंय. हा पुतळा शिल्पकार जयदीप आपटे यांनी बनवला (Malvan bandh Today) होता. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला घेरलंय. आक्रमक होत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आज जनसंताप मोर्चा देखील काढणार आहे.

महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका

मालवण बंदच्या पार्श्वभूमीवर मालवणमधील दुकानं आज बंद राहणार (Shivaji Maharaj statue collapse) आहेत. शिवछत्रपतींचा पुतळा केवळ ८ महिन्यांतच कोसळल्याच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे. पुतळ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्याच्या प्रवाहाने पुतळा कोसळल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटेंसह त्यांच्या सहकाऱ्यावराविरोधात एफआयआर नोंदवली गेली असल्याची माहिती मिळत आहे. विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे आणि भास्कर जाधव देखील आज मालवणला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT