Sindhudurg News Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News: मंत्रीपद मिळाल्यावर भाजपची भाटगिरी करताय; अतुल रावराणे यांचा नारायण राणेंवर निशाणा

मंत्रीपद मिळाल्यावर भाजपची भाटगिरी करताय; अतुल रावराणे यांचा नारायण राणेंवर निशाणा

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येक वेळेला भूमिका बदलली. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यावर ते (BJP) भाजपची भाट गिरी करत आहेत. अशा शब्‍दात ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्‍यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री असूनही तुम्ही या जिल्ह्यात एक तरी व्यवसाय आणलात का? असा सवाल उपस्थित करत कोकणातचं नव्हे; तर जिल्ह्यात तुमचं अस्तित्व संपल असल्याची टीका ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी केली आहे. नारायण राणे पराभूत झालेले नेते असून भारतीय जनता पक्षाच्या कुबड्या घेऊन ते जिवंत आहेत. स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी राणे धडपड करत असल्याची टीकाही रावराणे यांनी केली आहे.

तर सगळे पुरावे बाहेर काढेल

नारायण राणे यांचा आमदार मुलगा स्टंटबाज आहे. जिल्ह्यात टक्केवारी व्यतिरिक्त कोणतेही काम तुमचा आमदार मुलगा करू शकला नाही. आमदार नितेश राणेनी यापुढे धमकी देऊ नये; तुमचे सगळे पुरावे बाहेर काढीन असा इशारा ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख अतुल राव राणे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

Thursday Horoscope : खर्चाचा हिशोब लागणार नाही; मिथुनसह ५ राशींच्या लोकांचा जवळच्या लोकांकडून घात होण्याची शक्यता

Shocking: प्रेमाचा भयंकर शेवट! ४ मुलांची आई असलेल्या वहिनीच्या प्रेमात झाला पागल, भांडणानंतर २५ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

Maharashtra Politics: दोंडाईचामध्ये डाव साधला; शरद पवार गटात खिंडार, तीन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT