Sindhudurg Malvans Rajkot Fort Shivaji Maharaj Statue Saam Tv
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं अनावरण

Satish Kengar

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नौदल दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची बातमी समोर आली आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच आठ महिन्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. यातच आज वादळी वाऱ्याने थील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला आहे.

ठाकरे गटाने दिला आंदोलनाचा इशारा

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी जावून केली पाहणी. भारतात पुतळा पडल्याची कुठे घटना घडली नाही, मात्र सिंधुदुर्गात हा पुतळा पडला असल्याने या सरकारचे वाभाडे निघाले. याला जबाबदार असणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हा करा नाहीतर ठाकरे शिवसेना आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी यायला दिला आहे.

ते म्हणाले आहेत की, ''आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झालं होतं. हे काम अत्यंत घाईने करण्यात आलं. किल्ल्याचे काम करताना तो ढासळत असल्याच्या तक्रारीही शिवप्रेमींनी केल्या होत्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या प्रकाराचा आपण तीव्र निषेध करत आहोत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT