whale vomit, sindhudurg, local crime branch saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg : मालवणात खळबळ, २५ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; नऊ जण पाेलिसांच्या ताब्यात

जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- विनायक वंजारे

Vomit of whale : मालवण (malvan latest news) मसुरे वेरळ येथील माळरानावर तब्बल 25 कोटी रूपयांची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने (sindhudurg local crime branch) ही धडक कारवाई केली. (Breaking Marathi News)

एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे. व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल (sp sourabh agrawal) आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ही धडक कारवाई केली.

या प्रकरणात नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटी (अंबर ग्रीस), दोन चारचाकी गाड्या व एक दुचाकी असा सुमारे २५ कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची सिंधुदुर्गात जाेरदार चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT