sindhudurg dcc bank election voting counting begins 
महाराष्ट्र

Sindhudurg DCC Bank: नारायण राणे गटास धक्का; मतमाेजणी सुरु

आज सकाळी मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.

अमोल कलये, अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत काेणाची सत्ता येणार हे आज (शुक्रवार) स्पष्ट हाेणार आहे. या निवडणूकीच्या मत मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडीने ४ जागांवर तसेच राणे गटाने ३ जागांवर विजय मिळविला आहे. एका ठिकाणी उमेदवारांना समसमान मते मिळाली आहेत. तीन फे-यांमध्ये मतमाेजणी हाेणार असून जिल्ह्यात शिवसेना आणि नारायण राणे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (sindhudurg dcc bank election result update)

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) यंदा १९ जागांसाठी मतदान सुरु झालेले आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३९ उमेदवार आहेत. यासाठी ९८१ मतदारांपैकी ९६८ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला.

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे (bjp) सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा पणास लागली आहे.

विजयी उमेदवार

विद्याधर परब (शिवसेना)

व्हीक्टर डांटस (महाविकास आघाडी)

गणपत देसाई (शिवसेना)

विद्यप्रकाश बांदेकर (मविआ)

मनिष दळवी (राणे गट)

दिलीप रावराणे (राणे गट)

प्रकाश बाेडस (राणे गट)

यांचा झाला पराभव

प्रकाश गवस

दरम्यान जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी विठ्ठल देसाई यांना समान मत मिळाले आहे. त्यामुळे आता विजयी उमेदवार चिठ्ठीद्वारे निवडला जाण्याची शक्यता आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT