sindhudurg dcc bank election voting begins
sindhudurg dcc bank election voting begins 
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग DCC बॅंकेचा झेंडा मतदारांच्या हाती; उद्या फैसला

अनंत पाताडे, अमोल कलये, संभाजी थोरात

सिंधूदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Central Co-operative Bank Election) यंदा १९ जागांसाठी मतदान सुरु झालेले आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३९ उमेदवार आहेत. यासाठी ९८१ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे (bjp) सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा पणास लागली आहे.

दरम्यान रात्रीपासून मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम कणकवलीच्या ओम गणेश बंगल्यावर हाेता. या निवडणुकीच्या अनुषंगाने आजही सकाळ पासून नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यात हालचालींना वेग आल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या (dcc bank) निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यावर दाखल हाेत हाेते. नारायण राणे यांनी महत्वाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या.

आज सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला (sindhudurg dcc bank election 2021). वैभव नाईक, राजन तेली यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची (voting) प्रक्रिया सुरु राहणार आहे. ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे उद्या (शुक्रवार, ता. ३१) सकाळी नऊपासून मतमोजणीस प्रारंभ हाेईल.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantigiri Maharaj On Lok Sabha | शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम!

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा मेळावा

Sharad Pawar आणि Thackeray यांना पाहण्यासाठी इचलकरंजीकर धडपडले, नेमकं काय घडलं?

Sudhir Mungantiwar: शिवरायांची वाघनखं आणण्यास विलंब का होतोय?, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं कारण

Uddhav Thackaeray: भाजपने केलेल्या पाडापाडीचा सूड घेणार; इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

SCROLL FOR NEXT