Sindhudurg Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 
सिंधुदुर्ग
: झारखंड येथील मूळ रहिवासी असलेला परिवार कामानिमित्ताने कुडाळ येथे वास्तव्यास आलेला होता. पत्नी इतर पुरुषांसोबत फिरत असल्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना केबल तालुक्यातील नेरूर कविलगाव येथे घडली. पत्नीला मारल्यानंतर पती हा घटनास्थळावरून फरार झाला होता. 

कुडाळ तालुक्यातील (Sindhudurg) नेरूर कविलगाव येथे ओमप्रकाश सिंह व त्यांची पत्नी रेणुका सिंह हे तीन मुली व एक मुलगा यांच्यासह वास्तव्यास होते. ओमप्रकाश सिंह हा सेंट्रींगचे काम करायचा. यात मार्च २०२४ मध्ये त्याला भडगाव येथील सेंट्रींगचे काम मिळाले. त्यामुळे काही दिवस कवीलगाव आणि काही दिवस भडगाव येथे राहत होते. मात्र ओमप्रकाश हा पत्नीवर संशय घेऊन तिच्याशी वाद घालायचा. (Crime News) इतकेच नाही तर मारहाण देखील करत असल्याचे त्यांची मुलगी रियाने हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

पत्नीला मारल्याचे मुलीला फोन करून सांगितले 

दरम्यान १३ ऑक्टोंबरला ओमप्रकाश यांने रेणुका हिला भडगाव येथे बोलवलं. त्याच दिवशी संध्याकाळी रियाचे बोलणे आईसोबत झाले होते. १४ ऑक्टोंबरला रियाने आईला फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फोन बंद येत होता. यामुळे रियाने सायंकाळी आपल्या मैत्रिणीसोबत भडगाव धनगरवाडी येथे आई राहत असलेल्या घरी गेली असता घराला कुलूप दिसले. म्हणून रिया व मैत्रीण पुन्हा कुडाळ येथे आले. दरम्यान ओमप्रकाश याने १५ ऑक्टोंबरला पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास रियाला फोनवरून संपर्क साधून पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. त्यानंतर रियाने आपल्या नातेवाईकांना फोन लावून पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर रेणुका उर्फ रेश्मा मयत अवस्थेत आढळून आली. 

चिठ्ठी लिहून पती फरार 

ओमप्रकाश सिंह यांने पत्नीला मारल्यानंतर एक चिठ्ठी लिहून मृतदेहाच्या बाजूला ठेवली. या चिठ्ठीमध्ये माझ्या पत्नीने मला धोका दिलेला सहन झाला नाही. मला सोडण्याचा विचार करत होती आणि हे मला मान्य नव्हते म्हणून मी तिला मारले असल्याचे लिहिले आहे. चिठ्ठी ओमप्रकाश सिंह यांच्या हस्ताक्षरात असल्याचे तिची मुली रिया सिंह हिने सांगितले. ओमप्रकाश हा पत्नीला मारल्यानंतर पळ काढला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे माहिती घेतली असता ओमप्रकाश हा मुंबई दादर येथे असल्याचे समजून आले. त्यानुसार पुढील तपस सुरु आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra : अखेर काँग्रेसने डाव टाकला; प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर,VIDEO

Maharashtra News Live Updates: 225 बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट; आरोपीकडून दांडके आणि कपडे जप्त

Atul Parchure Last Video : अतुल परचुरेंची राज ठाकरेंसाठी अखेरची पोस्ट; एकेक शब्दात दिसत होती तळमळ, बघा VIDEO

Bomb Threat: चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती; एअर इंडियाचं विमान कॅनडात तर एअर इंडिया एक्सप्रेस उतरलं आयोध्येत

Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT