Simhastha Kumbh Mela Google
महाराष्ट्र

Simhastha Kumbh Mela Nashik: सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये, ७५०० कोटींचा आराखडा; पंचवटीत रामायण काळ झर्रकन नजरसमोर येणार!

Simhastha Kumbh Mela : २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्यासाठी आराखडा तयार करण्यात आलाय.

Bharat Jadhav

प्रयागराज येथे महाकुंभ मेळा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यापुढचा कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करण्यात आलाय. २०२७मध्ये होणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून ७५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. यामध्ये रेल्वे स्टेशन, बस स्टॅड, एअरपोर्ट यांना शहराशी कनेक्ट केले जाणार आहे.

नमामी गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून गोदा प्रदूषण मुक्तीच्याबरोबरच सुशोभीकरण देखील केले जाणार आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक बसवणे, दुभाजक सुशोभीकरण करणे, रिंग रोड तयार करणे यासह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पार्किंग अशा विविध विकासकामांचा समावेश असणार आहे.

शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक बसवणे, दुभाजक सुशोभीकरण करणे, रिंग रोड तयार करणे यासह शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पार्किंग अशा विविध विकासकामांचा समावेश असणार आहे. दरम्यान याप्रकरणी कुंभमेळ्याचा आराखडाबाबत राज्‍याचे प्रधान सचिव मंगळवारी ३१ डिसेंबरला मंत्रालयात आढावा घेतला. नाशिकसह त्र्यंबकेश्‍वरला २०२६-२७ मध्ये सिंहस्‍थ कुंभमेळा पार पडणार आहे.

महापालिकेने विविध विकासकामांवर आधारित पंधरा हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. याशिवाय भूसंपादन, रिंगरोड आदी कामांसाठी जादाचे चार हजार कोटी रुपये इतका खर्च मांडलेला होता. विभागीय आयुक्‍त डॉ. गेडाम यांच्‍याकडे नियोजनाची जबाबदारी आल्‍यानंतर त्‍यांनी आराखड्यात मोठी कपात केली होती. दरम्यान केंद्र व राज्य शासन कपात करून किमान पोट भरेल इतका निधी देईल, अशा अपेक्षेने आराखड्यातील खर्चाचे आकडे फुगवले होते.

सन २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेला जेमतेम १०५२ कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला होता.विभागीय आयुक्तांनी बैठकांचे सत्र लावत महापालिकेचा १५,००० कोटींचा आराखडा ६,९०० कोटींवर आणला होता. आता यात 600 कोटी रुपयांची कामे वाढविली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT