हा फोटो निरखून पाहा ... हा चांदीच्या ताटांचा बडेजाव आहे आमदार-खासदारांच्या जेवणावळीतला... ज्यांच्यावर काटकसरीची जबाबदारी आहे त्याच अंदाज समितीने आमदार-खासदारांच्या राजेशाही जेवणावळीवर अक्षरशः पैशांची उधळपट्टी केलीय... तब्बल 4550 रुपये एका थाळीवर उधळले..मात्र या थाळीत कोणते पंचपक्वान्न होते? पाहूयात...
चिकन खिमा
चिकन खिमा पॅटीस
सुरमई फ्राय
कोथिंबिर वडी
दही वडा
काळा वटाणा उसळ
मालवणी चिकन
घावणे
पुरी
मटण बिर्याणी
व्हेज बिर्याणी
पुरणपोळी
बादशहा फालुदा
लोकसभेचे सभापती, आमदार आणि खासदाराच्या उपस्थितीत 2 दिवसीय अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कऱण्यात आलं होतं... तर या आमदार आणि खासदारांसाठी 4550 रुपये किंमतीच्या चांदीच्या ताटातील शाही जेवणावळीवरुन विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत मिळालंय...यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय...आमदार-खासदारांच्या शाही जेवणावळीवरुन विरोधकांनी घेरल्यामुळे आता सरकार सारवासारव करण्याचा प्रयत्न करतय...
खरं तर राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे.. तर अर्थसंकल्पीय तूट 1 लाख 36 हजार कोटींवर गेलीय... त्यामुळेच निधीचा योग्य वापर करण्यासाठी विधीमंडळाच्या अंदाज समितीने काम करायला हवं... मात्र ही समितीच सरकारी पैशांची उधळपट्टी करत असल्याचं समोर आलंय...
अंदाज समित्यांच्या परिषदेत शाही सरंजाम
आलिशान वॉटरप्रूफ शामियाना
रेड कार्पेट
देखणी झुंबरं
आरसा असलेले पंचतारांकित वॉश बेसिन
स्वागतासाठी 40 फूट उंचीच्या फलकांच्या भिंती
कर्जबाजारीपणाला कंटाळून दररोज 7 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत.. अवघ्या लाखभर रुपयाच्या कर्जापायी कुटुंब उध्वस्त होत आहेत... मात्र 600 लोकांची शाही बडदास्त ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी तोच पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी दिला असता तर अनेक संसार उघड्यावर येण्यापासून वाचू शकले असते.....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.