भाऊबीजेपूर्वी बहिण भावावर काळाचा घाला, भीषण अपघातात भावंडांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

भाऊबीजेपूर्वी बहिण भावावर काळाचा घाला, भीषण अपघातात भावंडांचा मृत्यू

भीषण अपघातात सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली - दिवाळीचा सण म्हटलं की नात्यांचा सण असतो. पण याच आनंदाला हिंगोलीमध्ये धक्का बसला आहे. हिंगोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे.हिंगोलीतील वसमत तालुक्यातील ही घटना आहे. भाऊबीजेच्या एक दिवसापूर्वी बहिण भावावर काळाचा घाला पडला आहे. भीषण अपघातात सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या अपघातात आदर्श अरविंद सुरय्या आणि कीर्ती अरविंद सुरय्या या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील पहा -

मोठी बहीण आणि मामा हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराकरिता त्यांना नांदेड हलवण्यात आलं आहे. तर दिवाळीसाठी मामाकडे जात असताना हा अपघात घडला आहे. तटाकळगाव येथून वसमतकडे येणाऱ्या टाटा एस मॅजिक पिकप यांनी मोटर सायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतच आलेल्या मामा राजू खिलारे आणि मोठी बहीण आरती अरविंद सुरय्या जखमी झाले आहेत. वसमत तालुक्यामध्ये या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रात्री उशिरा घडली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT