Darshan Vichare set to join Shinde-led Shiv Sena in Shrivardhan. 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला जोरदार धक्का! तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेचा सुरुंग; बड्या नेत्यानं हातात घेतला धनुष्यबाण

Sunil Tatkare Raigad news : रायगडमधील श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी पक्ष सोडला असून ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Darshan Vichare Leaves NC : रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरूच आहे. सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असतोच. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. त्यातच आता रायगडमध्ये तटकरेंना जोरदार धक्का बसला आहे. मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा सुरुंग लावला आहे.

श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आणि उद्योजक दर्शन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते आता शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार महेंद्र थोरवे व आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करून तटकरेंना शह देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

पक्ष सोडताना दर्शन विचारे यांनी तीव्र शब्दांत तटकरेंवर टीका केली. रायगड जिल्ह्यात कोणताही राष्ट्रवादी पक्ष उरलेला नसून ती फक्त 'तटकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सत्तेत एकत्र असले तरी रायगडच्या स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांमधील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विचारे यांच्यामुळे श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीआधी हा तटकरेंना जोरदार धक्का मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आज मुंबई दौऱ्यावर.

Gokul Milk : ग्राहकांसाठी मोठी बातमी! अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार?

Ramayana Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर मोडले कमाईचे विक्रम! अवघ्या ८ दिवसांत १००० कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री

Gas Stove and Sink Distance: गॅस शेगडी आणि सिंकमध्ये किती अंतर असावं?

Chhath Puja : रेल्वेचं डोकं ठिकाणावर आहे का? छटपूजेसाठी रेल्वे स्टेशन्सवर भोजपुरी गाणी

SCROLL FOR NEXT