Police investigate the crime scene after a hotel owner was brutally killed in a daylight attack in Shrirampur, Ahmednagar district. saam tv
महाराष्ट्र

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

Shrirampur Hotel Owner Killed Case Full Details: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा हॉटेल मालकाची हत्या; गेल्या 11 दिवसांत चौथी प्राणघातक घटना. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भर दुपारी चाकू भोकसून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आकाश शेखर दुबय्या असे मृत व्यक्तीचे नाव असून, जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या 11 दिवसात श्रीरामपूरात प्राणघातक हल्ल्याची ही चौथी घटना घडली आहे. शहरातील नेवासा रोड परिसरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत हॉटेल मालक आकाश दुबय्या आणि कुणाल दुबय्या यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आकाश दुबय्या यांचा मृत्यू झालाय, तर कुणाल दुबय्या हा किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून आलेले दोघे जण हॉटेल लक्ष्मीनारायण येथे मुक्कामी होते, मात्र त्यांची आजच हॉटेलच्या रजिस्टरला अधिकृत नोंद केलेली दिसत आहे. शनिवारी त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र, ऑर्डर मिळण्यास काहीसा अवधी लागल्याने नशेत धुंद असलेल्या स्थानिक आरोपींनी हॉटेलच्या वेटरशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याला मारहाण केली. हा वाद मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी हॉटेल मालक आकाश दुबय्या पुढे आला असता, संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हॉटेलमधील टी-पॉय व इतर जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले. ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव अशी हल्लेखोरांची नावे आहे. श्रीरामपूरमध्ये भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाची हत्या झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामपूरमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT