SHRIRAMPUR SCHOOL DRAMA saam tv
महाराष्ट्र

नवऱ्याचे शिक्षिकेशी प्रेम संबंध; बायकोने थेट शाळेत जात धारण केला रुद्रावतार

Shrirampur Wife Confronts Primary Teacher: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात नवऱ्याचे शिक्षिकेशी कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पत्नीने थेट शाळा गाठली. शिक्षिकेला जाब विचारल्यानंतर ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवत निलंबनाची मागणी केली.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

रात्रंदिवस नवऱ्याशी चालणारे व्हॉट्सप चॅटिंग, नियमित होणाऱ्या भेटीगाठी आणि कौटुंबिक शांतता भंग झाल्याच्या रागातून एका संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळा गाठून संबंधित प्राथमिक शिक्षिकेला चांगलाच धडा शिकवल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. भरदिवसा आणि शाळा सुरू असतानाच हा हायव्होल्टेज ड्रामा घडल्याने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात स्वतःला उच्चशिक्षित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता सांगणारा एक तरुण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. वर्षभरापूर्वी या तरुणाचे परिसरातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेशी सूत जुळले.. हळूहळू हे प्रकरण इतके वाढले की, हा कार्यकर्ता संबंधित 'मॅडमला' शाळेत सोडणे आणि आणण्यासाठी स्वतःच्या वाहनाने थेट नेवासा फाट्यापर्यंत जाऊ लागला..

रात्री उशिरापर्यंत चालणारे चॅटिंग आणि संशयास्पद हालचालींमुळे कार्यकर्त्याच्या पत्नीचा संशय बळावला. पत्नीने नवऱ्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अखेर नवऱ्याचे शिक्षिकेशी सुरू असलेले प्रेमप्रकरण उघडकीस आल्याने पत्नीचा संयम सुटला. संतप्त पत्नीने थेट संबंधित शाळा गाठली. वर्गाच्या बाहेर असलेल्या त्या शिक्षिकेला पाहताच पत्नीचा राग अनावर झाला. रौद्ररूप धारण करत तिने थेट शिक्षिकेचे केस पकडत सर्वांसमोरच जाब विचारण्यास सुरुवात केली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे शाळेच्या आवारात मोठी घबराट आणि गोंधळ उडाला. लोक गोळा होत असल्याचे पाहून संबंधित शिक्षिकेने तेथून काढता पाय घेतला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवत संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT