shrikant shinde 
महाराष्ट्र

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? सीएमपदाच्या बदल्यात मुलगा डीसीएम?

Shrikant Shinde News In Marathi: भाजपचा मुख्यमंत्री झाला तर शिंदेंकडून उपमुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरु असतानाच खासदार श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा रंगलीये.

Tanmay Tillu

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रिपदासाठी खल सुरुए. त्यातच आता भाजपचा मुख्यमंत्री झाला तर शिंदेंकडून उपमुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरु असतानाच खासदार श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा रंगलीये. पाहया.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यातच एकनाथ शिंदेंनीही एक पाऊल मागे घेत भाजपचा निर्णय मान्य असल्याचं स्पष्ट केलंय.

मात्र मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेंना दिल्याची माहिती आहे. या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी थेट प्रतिक्रिया दिलीये.

संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यनमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो असंही शिरसाट म्हणाले. तर दुसरीकडे शिंदे गटात उपमुख्यमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा रंगतायत...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्विकारणार नसल्याचं जवळपास स्पष्ट आहे.त्या ऐवजी शिंदे गटातील दोन चेहऱ्यांपैकी एकाची वर्णी उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. यापैकी उदय सामंतांचं राजकीय टायमिंग कायमच अचूक राहीलंय. तर दादा भूसे शिंदेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सामंतांचं नशिब फळफळणार की कट्टर शिवसैनिक असलेल्या भुसेंची लॉटरी लागणार हेच पाहायचं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT