Nagar, mokka , crime news saam tv
महाराष्ट्र

Love jihad : श्रीरामपुरातील मुल्ला कटर टाेळीवर मोक्का; लव जिहाद प्रकरण भाेवलं

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Shrirampur Crime News : श्रीरामपूर (shrirampur) येथे घडलेल्या लवजिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटरस याच्यासह सहा जणांवर मोक्काची (mokka) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी संदिप मिटके यांच्याकडे होता. आतापर्यंत सहा संशियत आरोपींना पोलिसांनी (police) अटक केलेली आहे. (Breaking Marathi News)

इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर हा श्रीरामपूर येथील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या टाेळीनं विविध गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मुल्ला हा गुंडांच्या मदतीनं सर्वसामान्य लोकांना त्रास देत असे. त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत असतं. श्रीरामपूर मध्ये मुल्ला कटरची चांगलीच दहशत होती. (shrirampur latest marathi news)

अल्पवयीन मुलींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांन्तर करणे, मुलींची विक्री करणे, सामुहिक अत्याचार करणे आणि वेश्या व्यवसायास भाग पाडणे असे गंभीर गुन्हे त्याच्या टाेळीवर दाखल आहेत. त्यामुळे पाेलिसांनी मुल्ला कटर, पप्पू गोरे यांच्यासह सहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. (LIVE Marathi News)

श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम (1999 चे कलम 3(1),(ii),3(2),3(4) ) प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, पोलीस अधीक्षक नगर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र यांना पाठवला होता. त्या प्रस्तवास त्यांनी मंजुरी दिल्याने मुल्ला कट्टर टाेळीवर मोक्का लावण्यात आला आहे.

यामध्ये मुल्ला कटरसह चेंडवाल, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे शेवगाव येथील वेश्याव्यवसाय चालवणारी एक महिला आणि सचिन मधुकर पगारे यांचा समावेश आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे, पीएसआय सुरवडे, महिला पोलीस नाईक अश्विनी पवार, पोलीस नाईक संतोष दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल, रवींद्र माळी, विलास उकिरडे यांनी केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT