Vitthal Rukhmini Temple Pandharpur Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठ्ठल रूक्मिणी मंदिरावरील नियंत्रणासाठी वारकऱ्यांनी घेतला पुढाकार, बैठकीत झाला एकमुखी निर्णय

Decision On Pandharpur : पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज मठामध्ये सुहास महाराज फडतरे यांच्या उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची बैठक झाली.

भारत नागणे

Pandharpur News :

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर सरकारचे नियंत्रण कायमस्वरूपी राहावे असा एकमुखी ठराव वारकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सुहास महाराज फडतरे यांनी दिली. (Maharashtra News)

सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. समितीच्या मार्फत मंदिर समितीचा कारभार केला जातो. 2014 कालावधीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बडवे उत्पादांचे मंदिरातील सर्व अधिकार संपुष्टात आले आहेत‌.

त्यानंतर मंदिर समितीवर राज्य सरकारचे पूर्णपणे नियंत्रण आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी बडवे- उत्पातांच्या ताब्यात विठ्ठल मंदिर द्यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) आव्हान याचिका दाखल केली आहे. या संदर्भात दोन सुनावण्याही झाल्या आहेत.

त्यानंतर आता विठ्ठल मंदिर हे राज्य सरकारच्या ताब्यातच राहावे यासाठी वारकरी महाराज मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत. पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज मठामध्ये सुहास महाराज फडतरे यांच्या उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची बैठक झाली.

या बैठकीत डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी (dr subramanian swamy) यांच्या विरोधात कायदेशीर लढाई सुरू करण्याचा निर्णय झाला. तसेच आगामी काळात डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे अशी माहिती सुहास फडतरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT