पंढरपूर : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गसाठी संपादित केलेल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज (साेमवार) पंढरपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात निदर्शने करून कार्यक्रमाचा निषेध नोंदवला. Shri Sant Dnyaneshawar Maharaj Palkhi Marg and Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Marg Solapur Pandharpur nitin gadkari
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन आज (साेमवार) दुपारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यापूर्वीच माळशिरस येथील शेतकऱ्यांनी आज (साेमवार) पंढरपुरात येऊन पालखी महामार्ग भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवून गडकरी यांच्या विरोधात निदर्शने केली.
आळंदी पासून माेहाेळ पर्यंत सर्व गावातील शेतक-यांना न्याय दिला गेला. माळशिरस तालुक्यातील शेतक-यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. पाेलिसांकडून दबाव टाकून माळशिरस तालुक्यात काम सुरु केले. जबरदस्तीने आमची शेती ताब्यात घेतली. केंद्र आणि राज्य शासनाचा आम्ही निषेध करीत आहाेत. आज मंत्री गडकरी यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवून निषेध नाेंदविणार आहाेत अशी माहिती सोमनाथ वाघमोडे यांच्यासह बहुतांश शेतकरी वर्गाने दिली.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.