Aurangabad , Shraddha Pimpale saam tv
महाराष्ट्र

Aurangabad : शाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

श्रद्धा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात शाळेतून घरी निघालेल्या एका चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना (accident) कन्नड तालुक्यातील पाणपोई फाट्याजवळ घडली. यामुळे मुलीच्या (girl) कुटुंबिय शाेकसागरात बुडालं आहे. (Aurangabad Latest Marathi News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी : श्रद्धा पिंपळे ही शाळेतून घरी जाण्यासाठी सायकलवर निघाली हाेती. तिचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील पाणपोई फाट्या नजीक काल सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

श्रद्धा पिंपळे ही 13 वर्षाची हाेती. ती सातवीत शिकत होती. पाणपोई फाट्या जवळील बनशेंद्रा शिवारातील बहिरगाव डोणगाव रोडवर शाळेतून सायकलवर घरी जात असताना श्रद्धा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली.

तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे तिच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला. श्रद्धाच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT