नवरदेवाकडुन हवेत गोळीबार विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: नवरदेवाकडुन हळदी समारंभाच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार!

बीडच्या अंबाजोगाई शहरातील खळबळजनक घटना

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: लग्न म्हटलं की आनंदाचा क्षण आणि या आनंदाच्या क्षणात काही अतिउत्साही मंडळी आगळीक करतात. असाचं काहीसा प्रकार बीडच्या (Beed) अंबाजोगाईत समोर आलाय. अति आनंदाच्या उत्साहात, हळदी समारंभात नवरदेव व मित्राने डाँल्बीच्या तालावर हातात बंदुक घेत, हवेत फायरिंग केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून समोर आलाय. (Beed Crime News)

या घटनेमुळे शहरात भितिचे वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान शिक्षणाची पंढरी म्हणून बीडच्या अंबाजोगाईकडे पाहिलं जातं. मात्र याच अंबाजोगाईमध्ये भरदिवसा नवरदेवाकडून चक्क हवेत गोळीबार करण्याचा प्रकार समोर आल्याने, एकच खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई शहरामध्ये शनिवारी रात्री बीड रोडवरील एका मंगल कार्यालयात हळदी समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सांऊड सिस्टीमवर गाणे लावून नवरदेव, नातेवाईक, मित्रपरिवार आनंदाने गाण्याच्या तालावर धुंद होवुन डान्स करत होते. त्यातच मित्रांनी नवरदेवास खांद्यावर उचलून नृत्य करु लागले. यातच नवरदेव व मित्राने हातात बंदुक घेत हवेत फायरींग केली. त्यानंतर हळदी समारंभ आणि काल रविवारी लग्न सोहळा देखील पार पडला आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, याविषयी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र या घटनेने अंबाजोगाई शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल असून एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

SCROLL FOR NEXT