Nagpur Oral Cancer Report Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक वास्तव! आठवी-नववीचे ३,४८७ विद्यार्थी मुख कॅन्सरच्या उंबरठ्यावर; ५२% मुलांना तंबाखूचे व्यसन

Nagpur Oral Cancer Report: शासकीय डेंटल महाविद्यालय आणि रुग्णालयाने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली.

संजय डाफ

Nagpur News: नागपूर (Nagpur) विभागातील आठवी आणि नवव्या वर्गात शिकणारे तब्बल ३ हजार ४८७ विद्यार्थी मुख कॅन्सरच्या (Oral Cancer) उंबरठ्यावर आहेत. नागपूरातील शासकीय दंत महाविद्यालयाने केलेल्या मुख तपासणीत हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या अहवालाने पालक आणि विद्यार्थी वर्गाची चिंता वाढवली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर (Nagpur) शासकीय डेंटल महाविद्यालय आणि रुग्णालयाने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मुख तपासणी केली. आठव्या आणि नवव्या वर्गातील एकूण २३ हजार ८० विद्यार्थ्यांची मुख तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ३ हजार ४८७ विद्यार्थी मुख कॅन्सरच्या उंबरठ्यावर असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

तपासणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १५ टक्के विद्यार्थी मुख कर्करोगाच्या उंबरठ्यावर आहेत. तर तपासणी केलेल्या ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन असल्याचे उघड झाले आहे. मुख कर्करोगाचे प्रमाण असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.

नागपूर डेंटल कॉलेजने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा येथील विद्यार्थ्यांची मुख आणि दंत तपासणी केली. यामध्ये ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने, नागपूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभीये यांनी यावर चिंता व्यक्त केली. याबाबत जनजागृती करुन विद्यार्थ्यांना तंबाखू आणि खर्रा खाण्यापासून परावृत्त करावं, असं आवाहन त्यांनी केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT