Shocking Video From Beed Saam
महाराष्ट्र

बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

Shocking Video From Beed Hostel: बीडमधील वसतिगृहात धक्कादायक प्रकार. लहान चिमुकल्यांना बाथरूमसह कपडे धुवायला लावले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • बीड वसतिगृहात चिमुकल्यांना कपडे धुणे व साफसफाई करायला लावण्याचा प्रकार उघड

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त, वसतिगृह बंद करण्याची मागणी

  • होळकर योजनेचा गैरवापर करून कोट्यवधींचा गैरव्यवहार

  • संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी व कारवाई होणार असल्याचे संकेत

बीडमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. चक्क वसतिगृहातील लहान चिमुकल्यांना बाथरूमसह कपडे धुवायला लावले आहे. हा संपूर्ण प्रकार बीडच्या शृंगारवाडी फाटा येथील बाल नंदनवन इंग्लिश गुरुकुल वस्तीगृहात घडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, या संबंधित संस्थाचालकावर कारवाई करून तात्काळ वसतिगृह बंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना ही बहुजन कल्याण मंत्रालयामार्फत राबवली जाते. धनगर समाजातील गोरगरीब मुलांना शाळांमध्ये शिकवण्यासाठी ही योजना राबवली जाते. मात्र या योजनेचा गैरफायदा घेऊन कोट्यावधी रुपये कमवले जातात.

यशवंत राजेश होळकर नावाने राज्य सरकार योजना राबवत आहे. संबंधित योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास वीस वसतिगृह आहेत. त्यापैकी १८ वसतिगृह चालू आहेत. त्यामधील शृंगारवाडी येथील बाल नंदनवन हे वसतिगृह लहान मुलांसाठी आहे. मात्र या वसतिगृहाच चिमुकल्यांना साफसफाई करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आला.

या वसतिगृहामध्ये या अगोदरही असे चुकीचे प्रकार घडले होते. या संदर्भात चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. मात्र, पुन्हा असाच प्रकार समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणी संबंधित कर्मचारी आणि संस्थाचालकावर कारवाई करण्यात येईल. तसेच अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल अशी माहिती यशवंत राजे होळकर योजनेचे समाज कल्याणचे अधिकारी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला साई भक्ताच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न चोरट्याला बेदम चोप

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

Maharashtra Politics : भाजपला मोठा झटका बसणार? अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Honeymoon Destinations in India: लोणावळा खंडाळा... कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

SCROLL FOR NEXT