Black magic in Crematorium Saam tv
महाराष्ट्र

सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत

Black magic in Crematorium: सांगलीतील एका गावात अघोरी पूजा झाल्याचे समोर आलं आहे. एका स्मशानभूमीत सापडली काळी बाहुली आणि सुया आढल्याने नागरिकांमघ्ये भीतीची वातावरण पसरलं आहे.

विजय पाटील

सांगलीत अघोरी पूजेचा प्रकार

गावातील स्मशानात आढळली काळी बाहुली आणि सुया

भोंदूबाबाच्या पूजेने परिसरात खळबळ

पुरोगामी महाराष्ट्रात विज्ञानाच्या युगात अघोरी प्रथांचे पेव फुटले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेणे येथील स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास करणी आणि जादूटोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. भोंदू बाबांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

शेणे येथील स्मशानभूमी परिसरात सकाळी काही नागरिकांना जादूटोण्याचे साहित्य आढळल्याचे समोर आलं आहे. भोंदूबाबाकडे काळे कापड, टाचण्या टोचलेली काळी बाहुली, लिंबू, सुया, कोहळे आणि नारळ अशा वस्तू विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या आहेत. वाळवा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांचे सत्र वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीये. मात्र, या घटनेने लोकांच्या मनातील भीती दूर झालेली नाही.

या गंभीर प्रकारावर बोलताना 'अंनिस'चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी प्रशासनाला आणि भोंदू मांत्रिकांना इशारा दिलाय. 'कुठल्याही अघोरी कृत्याने कोणाचे भले किंवा वाईट होत नाही. हे केवळ अज्ञानी लोकांना लुटण्याचे धंदे आहेत, असे बनसोडे यांनी सांगितले.

स्मशानभूमीत अशा अघोरी क्रिया करणारा तो मांत्रिक कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार झाला, याबाबत आता गावात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अंनिसने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांना भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पक्षांतराच्या चर्चांवर खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले, पवारांचे नाव घेत दिलं स्पष्टीकरण

Maharashtra Live Update: उत्तराखंड राज्यात पावसाचा कहर,महाराष्ट्राचे भाविक अडकले

Housing Society New Rule: सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नियमात मोठे बदल; जाणून घ्या सरकारनं जाहीर केलेली नियमावली

पावसाळ्यासाठी बेस्ट आहेत या 5 साड्या; झटपट सुकतील आणि स्टायलिशही दिसतील

Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! सोनं ३००० तर चांदींच्या दरात ८००० रुपयांनी वाढ; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT