Ahilyanagar News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : मुसळधार पावसानं घराची भिंत कोसळली, वृद्ध महिलेचा झोपेतच मृत्यू

Ahilyanagar Heavy Rain News : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेजारच्या इमारतीची भींत कोसळली. या दुर्घटनेत पिंपळगाव उंडा येथील पारुबाई किसन गव्हाणे (७५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हा नगर जिल्ह्यातील पावसाचा तिसरा बळी ठरला आहे.

Alisha Khedekar

  • जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.

  • घराची भीत कोसळून पिंपळगाव उंडा येथील पारुबाई किसन गव्हाणे (वर्षे ७५) यांचा मृत्यू झाला.

  • नगर जिल्ह्यातील हा पावसाचा तिसरा बळी असल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

  • प्रशासनाकडून कुटुंबाला मदत मिळणार का याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशातच अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यात रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका एका वृद्ध महिलेला बसला आहे. तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे वृद्ध महीला पारुबाई किसन गव्हाणे यांच्या अंगावर घराची भींत पडून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथे पिंपळगाव उंडा गावात शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास किसन गव्हाणे व पारूबाई किसन गव्हाणे हे पती पत्नी आपल्या पत्र्याच्या घरात झोपले होते. सतत मुसळधार पाऊस सुरु असल्याने शेजारच्या जून्या इमारतीचा भींतीचा भाग त्यांच्या पत्र्याच्या घरावर कोसळला.

या दुर्घटनेत पारूबाई गंभीर जखमी झाल्या. पारूबाई यांना तातडीने रात्री बारा वाजता जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र ती रात्र पारूबाई यांच्यासाठी शेवटची रात्र ठरली. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या पारूबाई यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

त्यांनंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ. शशिकांत शिंदे यांनी रात्रीच शवविच्छेदन करून पारूबाई यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान गणेश जगताप यांनी घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली असून अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील हा तिसरा बळी असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रशासन पारूबाई यांच्या कुटुंबियांना मदत करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT