DEAD BIRD FOUND IN ANGANWADI NUTRITION FOOD PACKET IN DEVGAON NIPHAD | NASHIK NEWS Saam tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक घटना! अंगणवाडीच्या पोषण आहारात बंद पॅकेटमध्ये आढळला मृत पक्षी; पालकांचा संताप

Nashik News : नाशिकमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथे धक्कदायक प्रकार

  • अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी आढळला

  • पालकांमध्ये संतापाचे वातावरण

अजय सोनावणे, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे अंगणवाडीतील पोषण आहाराबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळला आणि एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील देवगाव बिट क्रमांक दोनमधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून नियमितप्रमाणे लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. संबंधित कुटुंबाने हे पाकीट घरी नेल्यानंतर ते उघडताना त्यामध्ये मृत पक्षी असल्याचे निदर्शनास आले. पक्षी कुजलेल्या अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला असून, हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली.

या घटनेमुळे अंगणवाडीतून वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या योजनेत अशा प्रकारची निष्काळजीपणा आढळणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच पोषण आहाराच्या उत्पादन, पॅकिंग आणि वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

दरम्यान, संबंधित प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. तपासानंतर नेमके तथ्य समोर येणार असले तरी या घटनेमुळे अंगणवाडी लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेनेचे नेते मदत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर

MLC Result: विधान परिषदेत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, नागपुरात चुरशीच्या लढतीत काँग्रेसचा विजय

Weather Update : महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा,'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

FDA Action: तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई, ८ नामांकित हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित; निकृष्ट दर्जाचा अन्न साठा जप्त

Friday Horoscope : आनंदाची बातमी मिळणार! लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ ५ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा वर्षाव; वाचा आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT