Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: वकिलाचं भयानक कृत्य! मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचाराचा प्रयत्न, भंडारा हादरलं

Physical Assault by Lawyer: एका वकिलानं आपल्याच लहान मुलीच्या मैत्रीणीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे.

Bhagyashree Kamble

शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. एका वकिलानं आपल्याच लहान मुलीच्या मैत्रीणीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्या आहेत. तसेच भंडारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. तो व्यवसायानं वकील असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आणि नराधमाला अटक केली.

पीडित मुलगी आपली आई आणि १३ वर्षीय भावासोबत राहत आहे. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. ते कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात. पीडित मुलगी आणि आरोपीची मुलगी समवयस्क असल्यामुळे दोघींमध्ये गट्टी जमली. ३ मार्चला पीडित मुलगी आरोपीच्या घरी मैत्रीणीला बोलावण्यासाठी गेली होती. त्यावेळी फ्लॅटचे दार आरोपीनं उघडले.

तेव्हा पीडित मुलीनं मैत्रीण घरी आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा विजयनं मुलगी घरात खेळत असल्याचं खोटं सांगत पीडित मुलीला घरात घेतलं. त्यानंतर घरात कुणीही नसल्याचं फायदा घेत विजयनं तिच्यावर जबरदस्ती केली. पीडित मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं तिला रोखून धरलं होतं. कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत ती घरी रडत रडत आली. तिने घरात आईला सगळी आपबिती सांगितली.

संतापलेल्या आईनं थेट पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT