35-year-old woman abducted in broad daylight in Beed saam tv AI
महाराष्ट्र

बीडमध्ये भरदिवसा थरार! घरातून उचलून आणत कारमध्ये कोंबलं; दिवसाढवळ्या ३५ वर्षीय महिलेचं अपहरण

Beed Abduction Case: बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरात भरदिवसा अपहरणाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी घरात घुसून महिला आणि तिच्या दोन मुलांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.

Bharat Jadhav

  • बीडमध्ये ३५ वर्षीय महिलेचे भरदिवसा अपहरण

  • दोन मुलांना मारहाण करून महिलेला कारमध्ये कोंबले

  • या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरातून धक्कादायक घटना घडलीय. भरदिवसा एका 35 वर्षीय महिलेचे अपहरण झालंय. दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या चार आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना मारहाण केली. मुलांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेला बळजबरीने गाडीत डांबून पळवून नेलं. या अपहरणाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडालीय. वारंवार घडणाऱ्या गुन्ह्याच्या घटनांमुळे बीड जिल्ह्याचं नाव कुख्यात जिल्हा म्हणून घेतलं जातंय.

या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातून महिलेची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हा सातत्याने चर्चेचा आणि पोलिसांना आव्हान देणारा विषय ठरत आहे. कारण, गेल्या दोन वर्षांपासून बीडमध्ये सातत्याने गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. त्यातच घरातून महिलेला उचलून तिचं अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पु्न्हा एकदा ऐरणीवर आलाय.

पोलिसांची तत्परता आणि महिलेची सुटका

घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तातडीने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातून पोलिसांनी या महिलेची आरोपींच्या तावडीतून सुखरूप सुटका पोलिसांनी केली. अपहरणकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेल्या या महिलेवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरणाच्या घटनेनंतर पसार झालेल्या इतर आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय. या महिलेचे अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे एसटी परिवहन विभागाच्या महसुलामध्ये यंदाची दिवाळीत भरगोच वाढ

No Onion Recipe : कांदा न वापरता बनवा 5 भाज्या, ज्या चवीसह आरोग्यालाही देतील फायदा

अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, परदेश दौरे बंद करा, गावोगावी फिरा, तरच नंबर लागेल

Health Tips : ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढला; चुकीची जीवनशैली आणि आहार ठरतोय कारणीभूत

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी पाणी शिंपडल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT