महाराष्ट्र

Shocking: रेल्वे रूळ ओलांडताना महिला मालगाडीखाली आली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Woman Lying On Railway Track To Save Life: पाटस रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडणारी एक महिला मालगाडी खाली आली, तरीही महिला बचावली आहे.

Bharat Jadhav

  • पुण्यातील पाटस रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना.

  • मालगाडी येताना महिलेनं रुळावर झोपून जीव वाचवला.

  • स्टेशनवर पूल नसल्याने महिला रुळ ओलांडत होती.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुणे रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पाटस रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी काळजचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. पादचारी मार्ग आणि फूट ओव्हरब्रिजची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना आजही जीव मुठीत धरून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. याच निष्काळजीपणामुळे शनिवारी सकाळी एक थरारक घटना घडली आणि एका महिलेने अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून सुटका करून घेतली.

महिला प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मकडे जात असताना स्थानकात उभी असलेली मालगाडी अचानक सुरू झाली.काही क्षणातच मालगाडी समोर येत असल्याचं लक्षात येताच त्या महिलेने प्रसंगावधान राखत दोन्ही रुळांच्या मधोमध झोपण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण मालगाडी तिच्या अंगावरून जात असल्याचा थरार पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. मालगाडी पुढे गेल्यानंतरच तिच्या जीवात जीव आला.सुदैवाने या घटनेत महिला सुखरूप बचावली.

या घटनेनंतर संबंधित महिलेने आपली व्यथा व्यक्त करताना सांगितलं, “मी पाटस स्टेशनवरून येत होते. मालगाडी अचानक हलू लागली आणि मला पटकन चालताही येत नव्हतं. माझ्यासोबतची दोन मुलं पटकन उडी मारून बाजूला गेली, पण मला काहीच सुचत नव्हतं. शेवटी जीव वाचवण्यासाठी गाडीखाली रुळांमध्ये झोपावं लागलं. त्या ठिकाणी दादर (फूट ओव्हरब्रिज) व्हावा, हीच माझी विनंती आहे.”

नेमकं काय घडलं?

एक महिला रेल्वे रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात होती. त्यावेळी स्थानकावर उभी असलेली एक मालगाडी सुरू झाली. काही सेकंदातच मालगाडीने वेग धरला. त्यामुळे रुळ ओलांडणाऱ्या महिलेकडे रुळाबाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. त्यावेळी महिलेनं प्रसंगावधान बाळगत रेल्वे रुळाच्या मधोमध सरळ झोपली. संपूर्ण मालगाडी महिलेच्या अंगावरून निघून जात नाही तोपर्यंत महिला रुळावरून उठली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

Crime News : पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये चकमक, ४ आरोपींचा एन्काऊंटर; ३ पोलिस गंभीर जखमी

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

SCROLL FOR NEXT