Nashik Truck-Car Accident Video Saam TV
महाराष्ट्र

Nashik Accident Video : ट्रक चालकाच्या एका चुकीने गेला ४ जणांचा जीव, नाशिकमधील थरारक अपघाताचा VIDEO समोर

Nashik Truck-Car Accident Video : मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकजवळील आडगावजवळ शुक्रवारी रात्री आयशर टेम्पो आणि ब्रिझा कार अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ भरधाव आयशर ट्रकने एका कारला समोरून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या भीषण अपघाताचा सीसीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

अपघाताचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ (Accident CCTV Video) पाहून अनेकांना धडकी भरली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, मुंबई-आग्रा महामार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. त्याचवेळी एक भरधाव आयशर ट्रक येतो आणि दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारवर आदळतो. क्षणार्धात दोन्ही वाहनांचा चक्काचूर होतो.

अपघातानंतर सुसाट वेगात असलेला आयशर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळतो. तर कार गोल फिरून (Viral Video) एका बाजूला जाऊन कोसळते. दरम्यान, अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिक दोन्ही वाहनांच्या दिशेने धावताना दिसतात. पण कारमधील मृत व्यक्तींना पाहून कुणाचीही मदत करण्याची हिंमत होत नाही.

यावेळी काहीजण तातडीने पोलिसांना फोन करतानाही दिसून येत आहे. अनेकदा अपघात कुणाच्या चुकीमुळे झाला हे पोलिसांना कळत नाही. कारण, दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी आडवी पडलेली असतात. तर काहीवेळा रस्त्याच्या कडेला जाऊन देखील उलटतात. मात्र, नाशिकमधील या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांच्या तपासाला गती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT