Shivsena Milind More News Saam TV
महाराष्ट्र

Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे उपशहरप्रमुखावर टोळक्याचा हल्ला; मारहाणीत मिलिंद मोरे यांचा मृत्यू

Shivsena Milind More News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (वय ४७) यांचा एका टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विरारमध्ये घडलीय.

Satish Daud

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (वय ४७) यांचा एका टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास विरार येथील सेव्हेन सी बीच रिसॉर्ट परिसरात घडलीय. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिलिंद मोरे हे शिवसेनेचे (Shivsena News) माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होते. रविवारी मिलिंद हे आपल्या कुटुंबासमवेत विरार येथील सेव्हेन सी बीच रिसॉर्ट परिसरात गेले होते. तेथे एका रिक्षाचालकाने त्यांच्या पुतण्याला धक्का दिला.

यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर रिक्षाचालकाने आपल्या साथीदारांना बोलावून मिलिंद मोरे आणि त्यांच्या पुतण्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी दोघांनाही बेदम मारहाण केली.या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मिलिंद मोरे यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला आणि ते जागीच कोसळले. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या मोरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी रिक्षाचालकासह हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. मिलिंद मोरे यांच्या पार्थिवावर सोमवारी ठाण्यातील जवाहर बाग वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT