Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Gram Panchayat Election : CM शिंदे की उद्धव ठाकरे? ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची सरशी? वाचा सविस्तर

निवडणुकीत उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक्या कुणाच्या पक्षाने जास्त जागा जिंकल्या असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत जवळपास सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीचे कल हाती आले असून निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. (Maharashtra News)

भाजप (२३५ जागा) पाठोपाठ काँग्रेस (१३४ जागा), राष्ट्रवादी, ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी या पक्षांनाही यश मिळालंय. दरम्यान, या निवडणुकीत उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक्या कुणाच्या पक्षाने जास्त जागा जिंकल्या असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाने आतापर्यंत १२८ जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटापाठोपाठ शिंदे गटानेही ११४ जागांवर वर्चस्व मिळवलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नेमका कुणाचा पक्ष या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. (Shivsena Uddhav Thackeray vs CM Eknath Shinde)

रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का

रत्नागिरी(ratnagiri) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचेही निकाल हाती आले असून या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.

जिल्ह्यातील एकूण 24 ग्रामपंचायतींवर ठाकरे गट शिवसेनेने आघाडी घेतली असून शिंदे गटाला मात्र जिल्ह्यात फक्त 7 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे. दापोली विधानसभा मतदार संघात मात्र शिंदे गटाने बाजी मारली असून विद्यमान आमदार योगेश कदम यांनी 10 पैकी 8 ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा फडकवून पुन्हा एकदा दापोली विधानसभा मतदार संघावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT