Salim Kutta Dance Case Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत, दहशतवाद्यासोबत डान्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; नाशिकमध्ये खळबळ

Salim Kutta Dance Case: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात अखेर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

Sudhakar Badgujar case registered

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात अखेर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत नाशिकमध्ये पार्टी करत बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचा सलिम कुत्तासोबत डान्स करताचा व्हिडीओ दाखवला होता. (Latest Marathi News)

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांचे नेमके काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. सदरील चौकशीचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला. पोलीस चौकशीतून सलिम कुत्तासमवेत झालेली डान्स पार्टी आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बडगुजर यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. बडगुजर यांच्यासह सलिम कुत्ता उर्फ मोहमंद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT