shivsena uddhav thackeray faction morcha at miraj palika saam tv
महाराष्ट्र

Sangli News : ठाकरे गटाचे संपर्क कार्यालय जमीनदाेस्त, मिरजेत शिवसैनिकांचा महापालिकेवर माेर्चा

यावेळी आंदाेलकांनी पालिका कार्यालया बाहेर घाेषणाबाजी केली.

विजय पाटील

Sangli News :

मिरज येथे ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले आहे. ज्या प्रमाणे ठाकरे गट शिवसेनेचे कार्यालय अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आले,त्याच धर्तीवर शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकावीत अशी मागणी करण्यात आली. (Maharashtra News)

तीन दिवसांपूर्वी मिरज शहरामध्ये ठाकरे गट शिवसेनेकडून संपर्क कार्यालय उभारण्यात आलं होते. मात्र शिंदे गट शिवसेनेकडून सदर जागेवर दावा करत बांधण्यात आलेलं शेड बेकायदेशीर असल्याची तक्रार करण्यात आली होती.

यामुळे पालिकेकडून थेट जेसीबीने पोलीस बंदोबस्तामध्ये ठाकरे गटाचे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे गट शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणतेही तक्रार नसताना केवळ राजकीय दबावापोटी कार्यालय पाडण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी पालिकेवर करण्यात आला. शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकावीत अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT