Ahmednagar News  Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Shivsainik Clash: संगमनेरमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, लोकसभा उमेदवारासमोरच भिडले शिवसैनिक

Political News : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच शिवसैनिक भिडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शिवसैनिकांनी यावेळी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे | शिर्डी

Ahmednagar News :

अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोरच शिवसैनिक भिडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शिवसैनिकांनी यावेळी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब वाकचौरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे संगमनेरचे शिवसैनिक आधीच नाराज होते. त्यांची ही खदखद या कार्यक्रमात बाहेर आली. (Loksabha Election 2024)

2014 साली शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेशानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेक शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचाच राग शिवसैनिकांमध्ये आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना याच नाराजीचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांना बोलावलं होतं. त्यानुसार अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते.

या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी जुने वाद उकरून काढले. त्यावरुन दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी वाद वाढू नये यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांनी मध्यस्थी करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद यानिमित्ताने बाहेर आले. पक्षातील या मतभेदांमुळे वाकचौरे यांना ही निवडणूक जड जाणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT