Sanjay Rathod  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Rathod: ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार एकमेकांच्या संपर्कात, संजय राठोडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. एकमेकांना डिवचण्याची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जात नाही. शिंदे गटाच्या काही नेत्यांच्या निशाण्यावर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली आहे. राजकीय संबंध वेगळे असले तरी जुनी मैत्री आमची कायम आहे, असं राठोड यांनी म्हटलं आहे.

आमच्यामध्ये मतभेत आहेत, मात्र मनभेत नाहीत. आम्ही एकमेकांशी आजही चांगलं बोलत आहोत. एकमेकांच्या संपर्कात आहोत, असं राठोड यांनी सांगितलं. शिवसेनेत आम्ही खांद्याला खांदा लावून कामं केली आहेत.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही काम करत होतो. आज तेही त्याच विचाराने काम करत आहेत आणि आम्ही देखील तसंच काम करत आहोत. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलंय तेवढे संबंध आमचे आहेत. त्यामुळे आजदेखील आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations in India: लोणावळा खंडाळा... कुठं कुठं जायाचं हनिमून

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांचा खात्मा; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडर ढेर

Kiwi Benefits During Periods: पिरियड्स दरम्यान किवी खल्लाने शरिराला कोणते फायदे होतात?

Horoscope: भाग्योदयाचा दिवस; नात्यांमधील प्रेम वाढणार,नव्या जबाबदाऱ्या अंगावर येणार

IAS Interview Questions: डोके खाजवायला लावतील IAS च्या इंटरव्हयूमधील 'हे' प्रश्न, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT