Shivsena Symbol Row saam tv
महाराष्ट्र

Shivsena Symbol Row: शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? १० फेब्रुवारीआधी आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता

Shivsena Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून कागदपत्रे व लेखी युक्तीवाद सादर करण्यात आले आहेत.

Chandrakant Jagtap

Shivsena Symbol Row: शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात मागच्या वाद सुरू आहे. निवडणूक आयोग या आठवड्यात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० फेब्रुवारीच्या अगोदर निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी निवडणूक आयोग शिवसेनेबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दाव्यावरूव दोन्हीटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून कागदपत्रे व लेखी युक्तीवाद सादर करण्यात आले होते. आता या आठवड्यात यावर निर्णय येणे अपेक्षित आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणावर निवडणूक आयोगाच काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर निकालावर शिंदे गटाचं भविष्य अवलंबून आहे. निकाल विरोधात आला तर शिंदे गटाला सुप्रीम कोर्टात फटका बसू शकतो. परंतु निकाल बाजूने आला तर त्याचा फायदा त्यांना सर्वोच्च न्यायालयात होऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयात देखील राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून या प्रकरणावर सलग सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असल्याचे सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नालासोपा-यात मुख्य रस्त्यावरील उघड्या गटारात पडला पादचारी नागरिक

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

SCROLL FOR NEXT